Advertisement

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा वाढली

आरबीआयने नवे पत्रक काढून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली असल्याचं सांगितलं आहे. आर्थिक निर्बंधामुळे बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध होते. ही मर्यादा अनेक वेळा वाढवली होती.

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा वाढली
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी) आरबीआयने अनेक निर्बंध घातले आहेत. बँकेच्या ग्राहकांसाठी पैसे काढण्यावरही निर्बंध आहेत. आता मात्र बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे. आरबीआयने पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. बँकेच्या ग्राहकांना आता ४० हजार रुपये काढता येणार आहेत. या आधी पीएमसी बँकेतून २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येत होती. 

आरबीआयने नवे पत्रक काढून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली असल्याचं सांगितलं आहे. आर्थिक निर्बंधामुळे बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध होते. ही मर्यादा अनेक वेळा वाढवली होती. आता बँकेतून ४० हजार रुपये काढता येणार आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तीनही आरोपींची पोलिस कोठडी आझाद मैदान येथील एस्प्लानेड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १६ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंग आणि एचडीआयएल कंपनीचे संचालक राकेश वाधवान व सारंग वाधवान यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी न्यायालयात हजर केले.



हेही वाचा -

एसबीआयची 'ही' फ्री सेवा बंद, आता आकारले जाणार पैसे

एअर इंडियाच्या १२० वैमानिकांचा राजीनामा





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा