Advertisement

एसबीआयची 'ही' फ्री सेवा बंद, आता आकारले जाणार पैसे

कर्ज घेण्यासाठी बँकेकडून आता प्रोसेसिंग शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तुमच्या कर्जावरच नाही तर टॉपअपवर देखील प्रोसेसिंग शुल्क आकारले जाईल.

एसबीआयची 'ही' फ्री सेवा बंद, आता आकारले जाणार पैसे
SHARES

स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी गृह कर्ज, वाहन कर्ज यासारख्या कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. हा जरी दिलासा असला तरी एका दुसऱ्या कारणासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कर्ज घेण्यासाठी बँकेकडून आता प्रोसेसिंग शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तुमच्या कर्जावरच नाही तर टॉपअपवर देखील प्रोसेसिंग शुल्क आकारले जाईल

प्रोसेसिंग फी का?

व्याजदर कमी केल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांची भरपाई म्हणून बँकेनं हे पाऊल उचलले आहे. सणासुदीला ग्राहकांना खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बँकेनं प्रोसेसिंग शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेण्याचे सांगितले होते

'इतके' प्रोसेसिंग शुल्क

एसबीआय फक्त गृह कर्ज नाही तर टॉप अप प्लॅन, कॉर्पोरेट आणि बिल्डर्सला देण्यात येणाऱ्या कर्जावर देखील प्रोसेसिंग शुल्क वसूल करेल. कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना ०.४ टक्के प्रोसेसिंग शुल्क आकारण्यात येईल. १० हजार ते ३० हजार रुपये दरम्यान हे शुल्क आकारलं जाईल. तर बिल्डरसाठी ५ हजार रुपये फ्लॉट शुल्क द्यावे लागेलPMC बँकेच्या ठेवीदारांचा मोठा निर्णय, पैसे वाचवण्यासाठी RBI पुढं ठेवला ‘हा’ प्रस्ताव

Credit Card वापरताना 'ह्या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पडेल मोठा भुर्दंड


संबंधित विषय
Advertisement