Advertisement

एअर इंडियाच्या १२० वैमानिकांचा राजीनामा

एकाच वेळी एवढ्या वैमानिकांनी राजीनामे दिल्याने कंपनी अडचणीत आली आहे. आधीच कंपनी मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. एअर इंडियावर तब्बल ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.

एअर इंडियाच्या १२० वैमानिकांचा राजीनामा
SHARES

आर्थिक संकटात सापडलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियापुढील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. एअर इंडियाच्या तब्बल १२० वैमानिकांनी राजीनामा दिला आहे. वारंवार मागणी करूनही पगारवाढ आणि पदोन्नती न मिळाल्याने वैमानिकांनी सामूहीक राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेले सर्व वैमानिक एअरबस ए ३२० चे वैमानिक आहेत. 

एकाच वेळी एवढ्या वैमानिकांनी राजीनामे दिल्याने कंपनी अडचणीत आली आहे. आधीच कंपनी मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. एअर इंडियावर तब्बल ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. राजीनामा दिलेल्या वैमानिकांनी म्हटलं की, व्यवस्थापनाने आमच्या मागण्यांकडं दुर्लक्ष केलं आहे. वेतनवाढ आणि पदोन्नती या दोन मागण्या आम्ही केल्या होत्या. मात्र, मागण्या पूर्ण न केल्यामुळे आम्ही राजीनामा दिला.

एअर इंडियाकडून वैमानिकांशी पाच वर्षांचा करार करण्यात येतो. मात्र, पाच वर्षात वेतनवाढ किंवा पदोन्नती करण्यात आली नाही. पगारही वेळेवर होत नसल्याचं वैमानिकांनी म्हटलं आहे. या मागण्यांकडे व्यवस्थापनाने वारंवार दुर्लक्ष केलं. त्यामुळे व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून आम्ही राजीनामा दिलं असं वैमानिकांनी सांगितलं आहे. एअर इंडियाकडे सध्या २००० वैमानिक आहेत. वैमानिकांच्या राजीनाम्यानंतर विमान फेऱ्यांवर परिणाम होणार नसल्याचं एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. 



हेही वाचा -

ATM मधून पैसे न आल्यास बँकेला भुर्दंड, ग्राहकांना फायदा

'ह्या' बँकांचं Car Loan आहे स्वस्त, खिशावर नाही पडणार अधिक ईएमआय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा