Advertisement

भारतात 'एवढे' आहेत कोट्यधीश करदाते

भारतात कोट्यधीश करदात्यांच्या संख्येत २०१८-१९ या आर्थिक वर्षात २० टक्के वाढ झाली आहे. या कोट्यधीश करदात्यांचे १ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न आहे.

भारतात 'एवढे' आहेत कोट्यधीश करदाते
SHARES

भारतात कोट्यधीश करदात्यांच्या संख्येत २०१८-१९भारतात कोट्यधीश करदात्यांच्या संख्येत २०१८-१९ या आर्थिक वर्षात २० टक्के वाढ झाली आहे.  या आर्थिक वर्षात २० टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने २०१८-१९ या वर्षीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, भारतात कर भरणारे ९७ हजार ६८९ कोट्यधीश आहेत. 

२०१७-१८ मध्ये भारतातील कोट्यधीश करदात्यांची संख्या ८१ हजार ३४४ होती. २०१८-१९ मध्ये हा आकडा वाढून ९७ हजार ६८९ झाला आहे. या कोट्यधीश करदात्यांचे १ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न आहे. सीबीडीटीच्या आकडेवारीनुसार, १ कोटी रुपयांपेक्षा अधिक करपात्र उत्पन्न असणाऱ्या करदात्यांची संख्या एका वर्षात १.६९ लाखाने वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कोट्यधीश करदाते २० टक्के वाढले आहेत. 

२०१८-१९ या वर्षासाठी १५ आॅगस्टपर्यंत ५ कोटी ८७ लाख लोकांनी आयकर रिटर्न भरला असल्याची माहिती सीबीडीटीच्या आकडेवारीतून समोर आली आहे. यामध्ये ५.५२ कोटी वैयक्तिक करदाते, हिंदू अविभाजित परिवार ११.३ लाख, १२.६९ लाख फर्म आणि ८.४१ लाख कंपन्यांचा समावेश आहे. हेही वाचा -


JIO चा दणका, फूल टॉक टाइम बेनिफिट बंद


बीएसएनएल व एमटीएनएल कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात


संबंधित विषय
Advertisement