Advertisement

बँक येणार तुमच्या दारात, घरबसल्या मिळणार बँकिंग सुविधा

सरकारी बँकांद्वारे डोअरस्टेप डिलिव्हरी सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये बँकेचा एजंट घरी जाऊन सेवा देणार आहे.

बँक येणार तुमच्या दारात, घरबसल्या मिळणार बँकिंग सुविधा
SHARES

सरकारी बँकेच्या ग्राहकांना आता बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. त्यांना घरबसल्या बँकिंग सेवा मिळणार आहे. त्यांना घरबसल्या पैसेही काढता येणार आहेत. 

सरकारी बँकांद्वारे डोअरस्टेप डिलिव्हरी सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये बँकेचा एजंट घरी जाऊन सेवा देणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा फक्त वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ही सुविधा सर्व ग्राहकांना मिळेल. मात्र, यासाठी त्यांना काही शुल्क द्यावं लागेल. सर्व सरकारी बँका एकत्र येऊन या योजनेवर काम करत आहेत.  सर्व बँकाकडून संयुक्तरित्या एखादी यंत्रणा नियुक्त करून त्यामार्फत ही सुविधा ग्राहकांना देण्यात येणार आहे. 

 युको बँकेनं सर्व सरकारी बँकांच्या वतीनं रिक्वेस्ट ऑफ प्रपोझल प्रसिद्ध केलं आहे. बँकांद्वारे नियुक्त केलेल्या यंत्रणेमार्फत एजंटची नेमणूक करण्यात येणार आहे. डोअरस्टेप बँकिंग सुविधेत ग्राहकांना ठेवी जमा आणि पैसे काढण्याची सुविधा तसंच इतर अनेक सेवा मिळणार आहेत. डोअरस्टेप बँकिंगसाठी सर्व सरकारी बँकांचं एक सामाईक काॅल सेंटर, वेबसाइट आणि मोबाइल अॅप असणार आहे.  यामार्फत ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंग सेवेची मागणी करता येणार आहे. एका ठरावीक वेळेपर्यंत ग्राहकांनी मागणी केल्यास त्याच दिवशी त्यांना घरी जाऊन सेवा दिली जाईल. त्यानंतर येणाऱ्या मागणीनुसार दुसऱ्या दिवशी दुपारच्या आधी सेवा मिळणार आहे. 


या सेवा मिळणार

  • पैसे जमा तसंच काढता येणार
  • चेक, ड्राफ्ट जमा करणे
  • अकाऊंट स्टेटमेंट
  • नवीन चेकबुक
  • एफडीवरील टीडीएसमधून सूट मिळण्यासाठी १५ जी आणि १५ एच फॉर्म घेणे
  • आयकर चलन
  • टीडीएस किंवा फॉर्म १६प्रमाणपत्र घेणे
  • गिफ्ट कार्डसारख्या प्रीपेड डिव्हाइसची डिलिव्हरी



हेही वाचा -

एसबीआयची बचत खात्यावरील व्याजदरात कपात

२ हजाराची नोट होणार बंद, 'हे' आहे कारण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा