Advertisement

एसबीआयची बचत खात्यावरील व्याजदरात कपात

नवीन व्याजदर १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. बँक ग्राहक नेहमी अधिक व्याज देत असलेल्या बँकांमध्ये आपलं खातं उघडतात. व्याजदर कमी केल्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

एसबीआयची बचत खात्यावरील व्याजदरात कपात
SHARES

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने १ लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. या खात्यांवर आता ३.२५ टक्के व्याज मिळणार आहे. याआधी या बचत खात्यांवर ३.५० टक्के व्याज मिळत होते.

नवीन व्याजदर १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. बँक ग्राहक नेहमी अधिक व्याज देत असलेल्या बँकांमध्ये आपलं खातं उघडतात. व्याजदर कमी केल्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे जास्त व्याजदर देणाऱ्या बँकांकडे एसबीआयच्या ग्राहकांचा ओढा असू शकतो. 

या महिन्याच्या सुरूवातीला रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली होती. कपातीनंतर रेपो दर ५.१५ टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेने या वर्षी सलग पाचव्यांदा रेपो दरात कपात केली आहे. या वर्षीच्या मे मध्ये एसबीआयने आपल्या बचत खात्यावरील व्याजदर आरबीआयच्या रेपो दराशी जोडले आहेत. हेही वाचा -

२ हजाराची नोट होणार बंद, 'हे' आहे कारण

भारतात 'एवढे' आहेत कोट्यधीश करदाते

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement