मुंबईत भरदिवसा तरुणीवर वार

प्रियकराने स्वत:लाही संपवलं

मुंबईत भरदिवसा तरुणीवर वार
SHARES

प्रेमसंबंधातील (Love Relationship) वाद विकोपाला जाऊन मुंबईच्या काळाचौकी (Kala Chowki) परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला (Deadly Attack) केला. त्यानंतर, त्याच शस्त्राने स्वतःलाही मारून घेत आयुष्य संपवलं.

या घटनेत जखमी झालेल्या मनीषा यादव (Manisha Yadav) या महिलेला तातडीने रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 नेमकं काय घडलं? 

समोर आलेल्या माहितीनुसार, सोनू बरई आणि मनीषा यादव यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, मृत तरुण सोनू हा मनीषावर वारंवार संशय (Suspicion) घेत होता. याच संशयावरून सुमारे आठ दिवसांपूर्वी (8 Days Ago) दोघांमध्ये मोठा वाद झाला होता आणि या वादानंतर त्यांचे ब्रेकअप (Breakup) झाले होते.

ब्रेकअप झाल्यानंतर सोनू बरईने मनीषा यादवला 'शेवटच्या भेटीसाठी' (Last Meeting) एका नर्सिंग होमजवळ बोलावले होते. 

या भेटीदरम्यान दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. यावेळी राग अनावर झालेल्या सोनूने मनीषावर धारदार शस्त्राने (Sharp Weapon) वार केले.

मनीषावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर, त्याच धारदार शस्त्राने तरुणाने स्वतःलाही मारून घेत आयुष्य संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा

शिवाजी पार्क परिसरात बंदी असूनही ड्रोन उडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा