Advertisement

रायगडाच्या विकासासाठी २० कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांची घोषणा


रायगडाच्या विकासासाठी २० कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांची घोषणा
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या विकासासाठी २० कोटी रुपये वितरित करण्याचा पहिला निर्णय घोषित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत शपथविधीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं.

मंत्रिमंडळाची मंजुरी

रायगड किल्ल्याच्या विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं सांगत हा निर्णय घोषित करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणं, 'राज्याच्या जनतेला महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून चांगलं सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असून तीन पक्षांचं हे सरकार राज्यातील सामान्य माणसासाठी काम करेल असं ठाकरे यांनी म्हटलं. 'राज्यात निर्माण झालेलं भीतीचं वातावरण दूर करण्याचं काम आपलं सरकार करेल', असंही ठाकरे म्हटलं.

आपलं सरकार

शेतकऱ्यांचा प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी 'राज्यातील शेतकऱ्यांना आपलं सरकार सर्वतोपरी मदत करेल' असं म्हटलं. 'राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकेल असे काम आपले सरकार करणार असून आता पर्यंत शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं मिळाली आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी मागील फडणवीस सरकारवर केली. आमचं सरकार शेतकऱ्यांना ठोस मदत देणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांबाबत ठोस निर्णय

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या योजना काय आहेत याची माहिती २ दिवसांत द्यावी अशा सूचना आपण अधिकाऱ्यांना केली असून, मला सर्व तपशील कळल्यानंतर शेतकऱ्यांबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.



हेही वाचा -

ठाकरे सरकार सुरू, उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री

शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलले?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा