शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलले?

उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हटलं? वाचा...

SHARE

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र उज्ज्वल प्रगती करेल, अशा शुभेच्छाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्या.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील उद्धव ठाकरेंचं ट्वीटरद्वारे अभिनंदन केलं

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे या शपधविधी समारंभाला उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला देशभरातले दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, कपील सिब्बल, एम. के स्टॅलीन, शंकरसिंह वाघेला यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. राज ठाकरे हे सहकुटूंब या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरली.हेही वाचा

ठाकरे सरकार सुरू, उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री

‘हे’ ६ नेते बनले कॅबिनेट मंत्री


संबंधित विषय
ताज्या बातम्या