Advertisement

‘हे’ ६ नेते बनले कॅबिनेट मंत्री

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील प्रत्येकी २ अशा एकूण ६ नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

‘हे’ ६ नेते बनले कॅबिनेट मंत्री
SHARES

शिवाजी पार्क मैदानात झालेल्या भव्यदिव्य महासोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील प्रत्येकी २ अशा एकूण ६ नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ६ नेत्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ या नेत्यांचा समावेश आहे.


एकनाथ शिंदे (५५ वर्षे) - शिवसेना

 • शिक्षण १० वी उत्तीर्ण
 • तळागाळातील शिवसैनिक ते मास लिडर असा प्रवास
 • ठाण्यात शिवसेना टिकवण्यात मोठं योगदान
 • ठाणे महापालिकेत १९९७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले
 • २००४ पासून सलग चार वेळा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार
 • युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) विभाग मंत्री
 • २०१९ मध्ये शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते म्हणून नियुक्ती

सुभाष देसाई (७३ वर्षे) - शिवसेना

 • शिक्षण १० वी उत्तीर्ण
 • उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांपैकी सर्वात जवळचे
 • १९९० मध्ये सर्वात पहिल्यांदा आमदार बनले
 • २००४, २००९ मध्येही आमदार, पण २०१४ च्या निवडणुकीत पराभवाचा धक्का
 • २०१५ मध्ये विधान परिषदेवर निवड
 • युती सरकारमध्ये उद्योगमंत्री

जयंत पाटील (५७ वर्षे) - राष्ट्रवादी काँग्रेस

 • शिक्षण बीई. सिव्हिल इंजिनिअरिंग
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वात विश्वासू नेते
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसंच राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते
 • इस्लामपूर मतदारसंघातून १९९० पासून सलग ७ वेळेस आमदार
 • आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
 • सलग ९ वेळा सादर केला अर्थसंकल्प


छगन भुजबळ (७२ वर्षे) - राष्ट्रवादी काँग्रेस

 • शिक्षण मॅकेनिकल इंजिनिअरिंग पदविका
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि शरद पवार यांचे विश्वासू
 • शिवसेनेतून राजकारणाची सुरूवात
 • शिवसेनेचे नगरसेवक, महापौर ते विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम
 • पहिल्या युती सरकारमध्ये महसूल, गृहनिर्माण मंत्री
 • तर आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदासोबत गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव
 • मनी लाॅंडरिंग प्रकरणात २०१६ पासून तुरूंगात, सध्या जामिनावर बाहेर
 • येवला मतदारसंघातून निवडून येत कमबॅक 

बाळासाहेब थोरात (६६ वर्षे) - काँग्रेस 

 • शिक्षण एलएलबी
 • काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी तसंच राहुल गांधी यांचे विश्वासू
 • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसंच विधीमंडळ गटनेते
 • संगमनेर मतदारसंघातून सलग ८ वेळेस आमदार 
 • आघाडी सरकारच्या काळात महसूल व खार जमीन विभागाचे मंत्री

नितीन राऊत (५७ वर्षे) - काँग्रेस

 • शिक्षण एमए. पीएचडी.
 • कार्यकारी अध्यक्ष- महाराष्ट्र काँग्रेस
 • अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी
 • आघाडी सरकारमध्ये रोजगार हमी आणि जलसंधारणमंत्री
 • नागपूर उत्तर मतदारसंघातून १९९९, २००४, २००९, २०१९ असे ४ वेळा आमदार
 • डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंब नियोजनावरील विचार तसंच आधुनिक भारताशी त्याचा संबंध इ. विषयांवर पुस्तक लेखनहेही वाचा-

ठाकरे सरकार सुरू, उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री

किमान समान कार्यक्रम ठरला, शेतकऱ्यांना कर्जमाफी, भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षणसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा