Advertisement

ठाकरे सरकार सुरू, उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी ६ वाजून ४५ मिनिटांनी शपथ घेतली.

ठाकरे सरकार सुरू, उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री
SHARES

ज्या शिवतीर्थावर प्रबाेधनकारांनी आपला ‘बाळ’ महाराष्ट्राला अर्पण केला... ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी असंख्य सभा गाजवल्या... जिथं त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्याच शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी ६ वाजून ४५ मिनिटांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. अत्यंत भव्यदिव्य अशा सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात तसंच नितीन राऊत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

या सोहळ्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. तसंच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनू सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.हेही वाचा- 

किमान समान कार्यक्रम ठरला, शेतकऱ्यांना कर्जमाफी, भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण

संजय राऊत यांची सुरक्षा वाढवली; 'ह्या' वक्तव्यामुळे जीवाला धोकाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा