Advertisement

संजय राऊत यांची सुरक्षा वाढवली; 'ह्या' वक्तव्यामुळे जीवाला धोका

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.

संजय राऊत यांची सुरक्षा वाढवली; 'ह्या' वक्तव्यामुळे जीवाला धोका
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांच्याभोवती आता ११ जवानांचं कडं असणार आहे.

केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी कलम ३७० हटवलं.  यावेळी राज्यसभेत भाषण करताना संजय राऊत म्हणाले होते की, कलम ३७० हटविणे म्हणजे एका भस्मासूराचा वध केल्यासारखे असून एका सैतानाला मारण्यासारखे आहे. ७० वर्षांपासून आपला देश एक डाग घेऊन चालत होता. तो डाग आज धुवून निघाला आहे. या भाषणाचे पडसाद देशातच नाही तर पाकिस्तानात देखील उमटले होते. संजय राऊत यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये पोस्टर्स लागले होते. त्यामुळे राऊत यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता.

संजय राऊत यांना आता वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. वाय प्रकारात १ किंवा २ कमांडो आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह ११ जवानांचे सुरक्षा कवच असते. दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांचाही (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर - पीएसओ) यामध्ये समावेश होतो.



हेही वाचा -

सोशल मीडियावर राजकीय पक्षाच्या गाण्यांनी घातलाय धुमाकूळ

उद्धव ठाकरेंच्या या '६' गोष्टी तुम्हाला माहीत नसतील




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा