उद्धव ठाकरेंच्या या '६' गोष्टी तुम्हाला माहीत नसतील

उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवास आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्यांच्या आवडी-निवडी बद्दल फार कमीच वाचलं किंवा ऐकलं असेल.

SHARE

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणजे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्क इथं शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवास आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्यांच्या आवडी-निवडीबद्दल फार कमीच वाचलं किंवा ऐकलं असेल. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल अशाच काही गोष्टी सांगणार आहोत जे ठाकरे कुटुंबाचं नाव उंचावतात

) ठाकरे घरातील पहिले मुख्यमंत्री

ठाकरे कुटुंबातील पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान उद्धव ठाकरे यांना मिळाला. १९९५ साली शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला होता. पण पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील उद्धव यांना ही संधी मिळाली आहे. आदित्य ठाकरेंनी देखील पहिल्यांदा आमदार म्हणून शपथ घेतली.

) फोटोग्राफीची आवड

उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे. रिकाम्या वेळेत त्यांना फोटोग्राफी करताना अनेक वेळा पाहिलं आहे. त्यांना एरीयल फोटोग्राफीची आवड आहे. अनेकदा त्यांनी हॅलिकॉप्टरमधून फोटोग्राफी केली आहे. याच नादात ते एकदा हॅलिकॉप्टरमधून पडणार देखील होते

) २८ किल्ल्यांची फोटोग्राफी

२००४ साली उद्धव ठाकरे यांनी हॅलिकॉप्टरमधून १० दिवस फिरत ४० तास फोटोग्राफी केली होती. यात त्यांनी २८ किल्ल्यांचे एरीयल फोटो घेतले होते. २८ किल्ल्यांचे ४ हजार ५०० हून अधिक फोटो त्यांनी काढले होते. २००४ मध्ये या फोटोंचं जहांगीर आर्ट इथं प्रदर्शन भरवले होते

) ० डिग्री फोटोग्राफी 

उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीची एवढी आवड आहे की ते ० डिग्री फोटोग्राफी पण करतात. २००८ साली त्यांनी कॅनडातील हटसनवेमध्ये पोलर बेयरचे फोटो काढले. त्यावेळी तिथलं तापमान ० डिग्री होतं. याशिवाय त्यांची दोन फोटो पुस्तकं देखील प्रकाशित झाली. पहिल्या पुस्तकाचं नाव महाराष्ट्र देश (२०१०) आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव पाहावा विठ्ठल ( २०११) आहे.

) १९९१ साली शिवसेनेच्या मंचावर पाऊल

उद्धव ठाकरे यांनी खूप आधीपासून शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली होती. पण १९९१ साली त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेच्या मंचावर पाऊल ठेवलं. १९९१ नंतर ते पक्षाच्या कामात अधिक सक्रीय झाले.

) २००२ साली बीएमसीची जबाबदारी

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २००२ सालच्या पालिका निवडणुकीची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली होती. या निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावरील जबाबदाऱ्या अधिक वाढल्या. २००३ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा कार्यकारी अध्यक्ष बनवलं

        


हेही वाचा

'हा' आहे ठाकरे आडनावामागील इतिहास

‘हे’ ६ नेते घेणार उद्धव ठाकरेंसोबत शपथ


संबंधित विषय
ताज्या बातम्या