Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

‘हे’ ६ नेते घेणार उद्धव ठाकरेंसोबत शपथ

महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख ​उद्धव ठाकरे​​​ गुरूवारी सायंकाळी ६.४० वाजता मुंबईतील शिवाजी पार्क इथं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.

‘हे’ ६ नेते घेणार उद्धव ठाकरेंसोबत शपथ
SHARES

महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी सायंकाळी ६.४० वाजता मुंबईतील शिवाजी पार्क इथं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील प्रत्येकी २ नेते देखील शपथ घेणार आहेत.

हेही वाचा- महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्यांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत

बुधवारी रात्री उशीरापर्यंत महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण शपथ घेणार? यावर खल सुरू होता. गुरूवारी सकाळी देखील ही बैठक पुढं सुरू ठेवण्यात आली. त्यानंतर या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तसंच काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे नेते शपथ घेतील, असं म्हटलं जात आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांची नावं अद्याप उघड झालेली नाही. त्यानंतर ३ डिसेंबरनंतर नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं म्हटलं जात आहे.

याविषयी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादीकडून आजच्या शपथविधीसाठी शरद पवार यांच्याकडून माझं नाव निश्चित करण्यात आलं आहे. त्यानुसार मी आज सायंकाळी मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.     

महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्यानुसार शिवसेनेला १६, राष्ट्रवादीला १४ आणि काँग्रेसला १२ मंत्रीपद मिळणार आहेत.हेही वाचा-

'हा' आहे ठाकरे आडनावामागील इतिहास

नाराज एकनाथ खडसे देणार पक्षाला सोडचिठ्ठी?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा