Advertisement

शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंचे मोदींना निमित्रंण

उद्धव यांनी शपथविधीला येण्यासाठी मोदींना आग्रह केला. तर मोदींनीही उद्धव यांना महाराष्ट्राची धुरा यशस्वीपणे सांभाळण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. म

शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंचे मोदींना निमित्रंण
SHARES

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते म्हणून आज शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. या शपथविधीला देशभरातून अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असताना. शिवसेनेने काडीमोड घेतलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही निमंत्रण दिले आहे. नरेंद्र मोदींनी ही उद्धव ठाकरेंचे निमंत्रण स्वीकारले आहे. मात्र या शपथ विधी सोहळ्याला येणार का?  याबाबत मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीकता साधली. तीनही पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा दिल्यानंतर आज शपथविधी सोहळा शिवाजी पार्क सायंकाळी संपन्न होणार आहे. या सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही निमंत्रण पाठवले होते. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री पंतप्रधान मोदी यांना फोन करत चर्चा केली. शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन लावला होता. या चर्चेत उद्धव यांनी शपथविधीला येण्यासाठी मोदींना आग्रह केला. तर मोदींनीही उद्धव यांना महाराष्ट्राची धुरा यशस्वीपणे सांभाळण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना लहान भाऊ म्हणणारे मोठे भाऊ नरेंद्र मोदी हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा