Advertisement

महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्यांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत

उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण कोण नेते मंत्रीपदाची शपथ घेतील? याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.

महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्यांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली मुदत संपण्याआधीच रातोरात उभं राहिलेलं फडणवीस सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं. यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं असून महाविकास आघाडीचे नेतेपदी निवड झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबत कोण कोण नेते मंत्रीपदाची शपथ घेतील? याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.

 हेही वाचा- राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी? यांचं नाव चर्चेत

महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फाॅर्म्युल्यानुसार प्रत्येक पक्षाला ४ आमदारांमागे एक मंत्रीपद मिळणार आहे. त्यानुसार शिवसेनेला १६ मंत्रीपद, राष्ट्रवादी काँग्रेसला १४ आणि काँग्रेसला १२ मंत्रीपदं मिळणार आहे. या मंत्रीपदासाठी आता पक्षांतर्गत चढाओढ सुरू झाली आहे. तिन्ही पक्षांनी एकजूट करत भाजपला सत्तेवरून खाली खेचलं. त्यामुळे मंत्रीपद आपल्या वाट्याला यावं असं प्रत्येक ज्येष्ठ नेत्याला वाटत आहे. पक्षनिहाय या नेत्यांच्या नावांची चर्चाही सुरू झाली आहे. ती पुढीलप्रमाणे:


  • शिवसेना - एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार
  • राष्ट्रवादी काँग्रेस - छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, मकरंद पाटील आणि राजेश टोपे
  • काँग्रेस - अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, सुनील केदार



हेही वाचा-

भाजपचा अहंकार संपवला- नवाब मलिक

गुगल सर्चमध्ये अजितदादाच; शरद पवार, फडणवीसांना टाकलं मागे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा