Advertisement

राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी? यांचं नाव चर्चेत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उचलबांगडी होऊ शकते. कोश्यारी यांच्या वादग्रस्त निर्णयाची सर्वच स्तरातून टीका झाली होती.

राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी? यांचं नाव चर्चेत
SHARES

रातोरात राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस करून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उचलबांगडी होऊ शकते. कोश्यारी यांच्या वादग्रस्त निर्णयाची सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यामुळे आपली प्रतिमा सुधारण्यासाठी केंद्र सरकार त्यांच्या जागी नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.

 हेही वाचा- 'हे' आहेत अल्पकाळाचे मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सत्ता स्थापन करण्यास तयार नसल्याने राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. परंतु सत्ता स्थापनेसाठी अवघ्या २४ तासांसाठी मुदत देऊन राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप शिवसेनेने लावला होता. तर राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी का दिली नाही? यावरून काँग्रेसने राज्यापालांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. 

 हेही वाचा- ‘मी पुन्हा येईन’ अमृता फडणवीस यांचा ट्विटरहून सूचक इशारा

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सहीचं पत्र ग्राह्य धरत कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेची संधी दिली. राज्यपालांच्या शिफारसीने पहाटे ५.१७ वाजता राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली आणि फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. राज्यपालांच्या या हातघाईवर देशभरातून टीका करण्यात आली. फडणवीस सरकार अवघ्या ४ दिवसांत कोसळल्यानंतर आता केंद्र सरकारकडून डॅमेज कंट्रोल करण्यात येणार आहे.

 त्यानुसार कोश्यारी यांच्या जागी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कलराज मिश्र यांना नियुक्त करण्यात येऊ शकतं. कलराज मिश्र यांनी भाजपच्या उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते. मिश्र यांनी राज्य आणि केंद्रीय मंत्रीपदही सांभाळलं आहे. 



हेही वाचा- 

उद्धव ठाकरेच घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ!

भाजपचा अहंकार संपवला- नवाब मलिक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा