‘मी पुन्हा येईन’ अमृता फडणवीस यांचा ट्विटरहून सूचक इशारा

जाता जाता मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी ट्विटरहून केलेल्या पोस्टने सर्वांच्याच भूवया उंचावल्या,

SHARE

मागील अनेक दिवसांपासून अस्थिर असलले राजकिय वातावरण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याने थंड झाले. ऐकीकडे महाआघाडी सत्तास्थापनेची जोरदार तयारी करत असताना. दुसरीकडे मिसेस मुख्यमंत्र्यांनी ट्विटरहून जाता जाता एक सूचक इशारावजा शायरी पोस्ट केली आहे.  अमृता यांच्या या शायरीची सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापन केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांना पाय उतार व्हावं लागले.  त्यावरून जाता जाता मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी ट्विटरहून केलेल्या पोस्टने सर्वांच्याच भूवया उंचावल्या,  अमृता यांनी ‘पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिजां की जद मे हूँ मौसम जरा बदलने दे!” ही शायरी लिहित, ‘ तुम्हची वहिनी म्हणून पाच वर्ष संस्मरणीय केले, त्याबद्दल आभार !मी माझ्या क्षमतेने उत्कृष्ट जबाबदारी पार पाडण्याचा  प्रयत्न केला. यामागे केवळ सेवा आणि सकारात्मक बदल करण्याचा उद्देश होता’  असे म्हणतं महाराष्ट्राच्या जनतेचे आभार माणले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा एका भाषणातील मी पून्हा येईन, मी पून्हा येईन हे विधान सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असताना. अमृता यांनी ट्विटरहून दिलेल्या या सूचक इशाऱ्याची ही सध्या जोरदार चर्चा आहे.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या