Advertisement

गुगल सर्चमध्ये अजितदादाच; शरद पवार, फडणवीसांना टाकलं मागे

शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून अजित पवार यांच्याबद्दल गुगलवर सर्च होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं.

गुगल सर्चमध्ये अजितदादाच; शरद पवार, फडणवीसांना टाकलं मागे
SHARES

भाजपाला पाठिंबा देत शनिवारी सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन फक्त राज्याच्याच नाही तर देशभरातील राजकारणात खळबळ उडवली होती. या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे असलेले अजित पवार यांच्याबद्दल देशभरात मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं गुगल ट्रेण्डवर समोर आलं आहे. 

मागील चार दिवसांपासून देशभरात अजित पवार यांचीच चर्चा असल्याचं गुगल ट्रेण्डवरुन दिसून येत आहे. शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून अजित पवार यांच्याबद्दल गुगलवर सर्च होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं. त्यानंतर पुढचे चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत अजित पवार यांचं नाव गुगलवर अधिक सर्च होत होते. अजित पवार यांचे नाव शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावांपेक्षा अधिक सर्च झालं आहे. 

 राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड,  मेघालय, मध्य प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, गोवा, केरळ, आसाम आदी राज्यांमध्ये अजित पवार यांच्याबद्दल अधिक सर्च झालं आहे. महाराष्ट्रात अजित पवार यांच्याबद्दल ४३ टक्के तर शरद पवारांबद्दल ३९ टक्के आणि फडणवीस यांच्याबद्दल १८ टक्के सर्च झालं आहे. गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटकमधूनही अजित पवारांबद्दल मोठ्या प्रमाणावर सर्च झाल्याचं गुगल ट्रेण्डनुसार दिसत आहे. विशेष म्हणजे मिझोराममध्ये  फक्त अजित पवार यांच्याबद्दल सर्च झालं आहे. 



हेही वाचा -

‘उद्धवदादू’च्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार का राज ठाकरे?

सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले, खडसेंचा भाजपला घरचा आहेर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा