‘उद्धवदादू’च्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार का राज ठाकरे?

शपथविधी साेहळ्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: भेटून किंवा फोनवरून राज ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

SHARE

महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सज्ज झाले असून येत्या गुरूवारी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं म्हटलं जात आहे. ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत असल्याने या शपथविधी सोहळ्याला त्यांचे चुलतबंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

भाजपचं फडणवीस सरकार अवघ्या ४ दिवसांत कोसळल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. महाविकास आघाडीकडे १६२ आमदारांचं संख्याबळ असून हे संख्याबळ बहुमत (१४५) सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे. राज्यपालांनी या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

त्याआधी महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत उद्धव ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क इथं होणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली. या शपथविधी साेहळ्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: भेटून किंवा फोनवरून राज ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.हेही वाचा-

उद्धव ठाकरेच घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ!

चौथ्या दिवशीच फडणवीस सरकार कोसळलं, विश्वासदर्शक ठरवाआधीच दिला राजीनामासंबंधित विषय
ताज्या बातम्या