Advertisement

सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले, खडसेंचा भाजपला घरचा आहेर

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विचारला असता हे पुरावे भाजपने रद्दीत विकल्याचं म्हणत पक्षाला घरचा आहेर दिला.

सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले, खडसेंचा भाजपला घरचा आहेर
SHARES

आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळ्यावरून ज्या अजित पवार यांना टीकेचं लक्ष्य केलं, त्याच पवारांना हाताशी घेऊन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे सरकार औटघटकेचं ठरलं असलं, तरी भाजपने सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे देण्याचा जो दावा केला होता, त्याचं काय झालं? असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विचारला असता हे पुरावे भाजपने रद्दीत विकल्याचं म्हणत पक्षाला घरचा आहेर दिला. 

हेही वाचा- भाऊ बहिणीची गळाभेट, विधानसभेत सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचं स्वागत

विधीमंडळ परिसरात उपस्थित असलेल्या एकनाथ खडसे यांना प्रसारमाध्यमांनी गराडा घातला. त्यावेळी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या चुकलेल्या रणनितीवर अचूक बोट ठेवलं. निवडणुकीत कमी जागा का मिळाल्या? याचं विश्लेषण करताना ते म्हणाले की, 

भाजपने आधी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. पण ताे बदलून शिवसेनेसोबत महायुती करत निवडणूक लढवली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून फिस्कटल्यामुळे महायुतीचं सरकार दुर्दैवाने स्थापन होऊ शकलं नाही. त्यात भाजपच्या ज्या नेत्यांनी वाईट परिस्थिती असतानाही महाराष्ट्रात पक्ष वाढवला, त्यांना निवडणुकीच्या कामातूनही दूर करण्यात आलं. भलेही आम्हाला तिकीट दिलं नाही, तरी मी, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावन्नकुळे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना हाताशी धरून प्रचार केला असता, तरी निवडणुकीत २५ जागा जास्त मिळाल्या असत्या. 

भाजप विरोधी बाकांवर असताना अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यावरून टीकेचं लक्ष्य केलं होतं. त्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे सादर करून कारवाई करू असा दावाही भाजपने केला होता, त्याचं काय झालं? या प्रश्नावर उत्तर देताना खडसे यांनी सांगितलं की, त्यावेळेस रद्दीचा भाव जास्त असल्याने हे पुरावे आम्ही रद्दीत विकले. हेही वाचा-

'हे' आहेत अल्पकाळाचे मुख्यमंत्री

मिशन पूर्ण, उद्यापासून बोलणार नाही- संजय राऊतसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा