Advertisement

मिशन पूर्ण, उद्यापासून बोलणार नाही- संजय राऊत

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शिवसेनेचं सूर्ययान उतरवण्याचं आमचं मिशन यशस्वी झालं आहे.

मिशन पूर्ण, उद्यापासून बोलणार नाही- संजय राऊत
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेची भूमीका मांडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरूवारपासून पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. 'मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शिवसेनेचं सूर्ययान उतरवण्याचं आमचं मिशन यशस्वी झालं आहे. माझी जबाबदारी आता कमी झाली आहे. उद्यापासून मी मीडियाशी फारसं बोलणार नाही', असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

शिवसेनेचा मुख्यमंत्री

महाविकासआघाडी अस्तित्वात येऊ नये म्हणून भाजप करत असलेल्या राजकारणावर संजय राऊत हे दररोज भूमीका मांडत होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे ठामपणे सांगत होते. भाजपकडून त्यांना 'व्हिलन'ही ठरवण्यात आलं होतं. हे प्रयत्न फळाला आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तसंच, संजय राऊत यांनी 'महाराष्ट्राचं पुढचं सूर्ययान दिल्लीत उतरेल’, असा विश्वास व्यक्त केला.

महाविकास आघाडीचं सरकार

'महाराष्ट्राचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरेल असं मी म्हणालो होतो. तेव्हा लोक माझी चेष्टा करत होते. पण आमचा पक्ष आणि आम्ही काय करतोय हे आमचं पक्कं माहीत होतं. महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचं सरकार येतंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे लवकरच शपथविधी होतील. त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रश्नांवर ते बोलतील. आमचं मिशन पूर्ण झालेलं आहे. आता आपलं काम संपलं आहे’, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

इतिहास चाळून पाहा

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत 'दिल्लीच्या तख्तापुढं महाराष्ट्र झुकणार नाही. तुटणार नाही, असा इशारा त्यांनी पुन्हा एकदा दिला. शरद पवार समजून घ्यायला १०० जन्म घ्यावे लागतील असं मी उगाच म्हणालो नव्हतो. भाजपनं शरद पवारांचा इतिहास चाळून पाहायला हवा,' असा टोलाही राऊत यांनी लगावला. त्याशिवाय, संजय राऊत यांनी महाविकासआघाडीचे शिल्पकाकर शरद पवार यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं.



हेही वाचा -

भाऊ बहिणीची गाळाभेट, विधानसभेत सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचं स्वागत

‘मी पून्हा येईन’ अमृता फडणवीस यांचा ट्विटरहून सूचक इशारा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा