Advertisement

भाऊ बहिणीची गळाभेट, विधानसभेत सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचं स्वागत

शपथविधी सोहळ्याला येणाऱ्या सर्वच आमदारांचे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे स्वागत करत आहे.

भाऊ बहिणीची गळाभेट, विधानसभेत सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचं स्वागत
SHARES

महाराष्ट्रातील सत्तापेचावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर अखेर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर रोजी भाजपशी हातमिळवणी करत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, या दोघांनीही मंगळवारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्रीपदासाठी एकमतानं निवड करण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे.

आमदारकीची शपथ

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड केली असून, हे निवडून आलेल्या आमदारांना आमदारकीची शपथ देत आहेत. या शपथविधी सोहळ्याला येणाऱ्या सर्वच आमदारांचे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे स्वागत करत आहे. यावेळी सत्तासंघर्षाच्या कालावधीत भाजपाबरोबर गेलेले व पुन्हा माघारी आलेले आपले बंधु अजितदादा यांचं या ठिकाणी आगमन होताच, सुप्रियाताईंनी त्यांची गळाभेट घेत स्वागत केले. अजितदादांनी देखील मुक्त मनानं हे स्वागत स्वीकारलं.

भावनिक आवाहन

राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान अजितदादांनी जेव्हा अचानकपणे भाजपाबरोबर जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तेव्हा सुप्रिया सुळे अतिशय व्यथित झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी सातत्यानं अजित पवारांना परत येण्यासाठी भावनिक आवाहन केलं.

मंत्रीपदाचा राजीनामा

सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व कुटुंबातील सदस्य देखील अजित पवारांनी परत यावं यासाठी प्रयत्नशील होते. अखेरीस मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवार यांनी भाजपा सरकारमधील उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व रात्री उशीरा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर 'मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार', असं अजित पवार यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.


हेही वाचा -

‘मी पून्हा येईन’ अमृता फडणवीस यांचा ट्विटरहून सूचक इशारा

'मेट्रो ३'च्या भुयारीकरणाचं ७० टक्के काम पुर्णRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा