Advertisement

'मेट्रो ३'च्या भुयारीकरणाचं ७० टक्के काम पूर्ण

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाचं ७० टक्के काम पुर्ण झालं आहे.

'मेट्रो ३'च्या भुयारीकरणाचं ७० टक्के काम पूर्ण
SHARES

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाचं ७० टक्के काम पुर्ण झालं आहे. या प्रकल्पाच्या एकूण ५५ किमी भुयारीकरणापैकी ३८.२५ किमी भुयारीकरण पूर्ण झालं आहे. २ वर्षांत एकूण २३ टप्प्यात भुयारीकरणाचं ७० टक्के काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती मिळते.


सेगमेन्ट रिंग्जचा उपयोग

या प्रकल्पाच्या एकूण ३८.२५ कि.मी. भुयारीकरणासाठी २७ हजार ३० सेगमेन्ट रिंग्जचा उपयोग करण्यात आला आहे. आतापर्यंत २३ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहे. त्यामुळं, येत्या वर्षांत उर्वरित ९ टप्पे पूर्ण होण्याची शक्यता मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं वर्तवली आहे. एकूण ७ भागांमध्ये हे काम केलं जात आहे. मरोळ नाका ते आरे स्थानक या टप्प्यातील ८७ टक्के भुयारीकरण पूर्ण झालं आहे. तसंच, १२ डिसेंबपर्यंत येथील भुयारीकरणाचं १०० टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


वाहतूकीत बदल

मुंबईतील भूभाग हा अभियांत्रिकी दृष्टिकोनातून अतिशय आव्हानात्मक आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय बदल दिसून येणार आहे. या मेट्रोतून दररोज १७ लाख लोक प्रवास करण्याची शक्या ता आहे.



हेही वाचा -

पालिका मंडईबाहेरील तांदळाच्या भुशाच्या ढीगामुळं दादरकर हैराण

गूगलची 'ही' सेवा लवकरच होणार बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा