पालिका मंडईबाहेरील तांदळाच्या भुशाच्या ढीगामुळं दादरकर हैराण

मुंबईत गोड्या पाण्यातील माशांची मागणी प्रचंड वाढली आहे.

SHARE

मुंबईत गोड्या पाण्यातील माशांची मागणी प्रचंड वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मागणी वाढल्यानं हैदराबाद, कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणावर मुंबईत गोड्या पाण्यातील मासे येत आहेत. मुंबईत येणारे हे मासे दादरच्या पालिका मंडईत उतरवले जातात. मुंबई या माशांची मागणी वाढली असली, तरी मुंबईकरांना त्या माशांमुळं मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. गोड्या पाण्यातील या माशांचा साठा करण्यासाठी बर्फ आणि तांदळाच्या कोंड्याचा भुसा वापरला जातो. मासे मंडईत उतरवल्यानंतर हा भुसा रस्त्यावरच टाकला जात असल्यामुळं रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा त्रास सोसावा लागतो आहे.

महापालिकेची मंडई

दादर पश्चिम येथील फुलमार्केटच्या बाजूला महापालिकेची मंडई आहे. या मंडईत माशांची घाऊक प्रमाणावर आयात होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या मंडईच्या बाहेर सकाळच्या वेळी माशांचे ट्रक उभे असतात. याच मंडईच्या बाहेर लोअर परेलच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर सुमारे २५ ते ३० मीटपर्यंतच्या भागात तांदळाच्या भुशाची रास पडलेली असते. या भुशाचा त्रास पादचाऱ्यांना व वाहनचालकांना होत असल्याच्या तक्रारींमध्ये आता वाढ होत आहेत.


अनेक तक्रारी दाखल

वाहनांच्या ये-जा करण्यामुळं हा भुसा उडून नाका, तोंडात, डोळ्यात जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. दुचाकीवरून जाणाऱ्यांना तर या भुशाचा खूप त्रास होतो. पालिकेचे सफाई कामगार हा भुसा ब्रशनं फक्त आत सरकवण्याचं काम करतात, मात्र हा भुसा कोणीही उचलत नसल्याचं समजतं. या भुशामुळं पर्जन्य जल वाहिन्याही तुंबण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं वर्षांनुवर्षे रस्त्यावर हा भुसा असाच पडून राहू नये तो एकतर उचलावा किंवा संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.हेही वाचा -

उद्धव ठाकरेच घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ!

चौथ्या दिवशीच फडणवीस सरकार कोसळलं, विश्वासदर्शक ठरवाआधीच दिला राजीनामासंबंधित विषय
ताज्या बातम्या