Advertisement

नाराज एकनाथ खडसे देणार पक्षाला सोडचिठ्ठी?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नाराज एकनाथ खडसे देणार पक्षाला सोडचिठ्ठी?
SHARES

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षश्रेष्ठींवर नाराज असलेल्या खडसेंनी मंगळवारी दुपारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पक्षाला घरचा आहेर दिला होता. 

हेही वाचा- शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंचे मोदींना निमंत्रण

खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्ष सोडून जाणार नसल्याचं वक्तव्य केलं असलं, तरी ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. खडसे यांनी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची बुधवारी भेट घेतल्यापासून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय खडसे नेहमीच आमच्या संपर्कात असल्याचं विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

फडणवीस सरकार अवघ्या ४ दिवसांत कोसळल्यानंतर आमदारांच्या शपथविधी दरम्यान विधीमंडळ परिसरात उपस्थित असलेल्या खडसे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पक्षातील वरिष्ठांनी तिकीट कापलं असलं, तरी ज्येष्ठ नेत्यांना निवडणूक प्रचारात सामावून न घेतल्याने त्याचा पक्षाला फटका बसल्याचं ते म्हणाले. ते स्वत:, विनोद तावडे, प्रकाश मेहता, बावनकुळे अशा नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती, तर पक्षाच्या २० ते २५ जागा वाढल्या असत्या असं त्यांनी सांगितलं. 


हेही वाचा- 

म्हणून उद्धव ठाकरेंनी सोडलं ‘सामना’चं संपादकपद!

'सत्ता आली पण पत्ता गेला', सुमीत राघवनचा शिवसेनेला टोला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा