Advertisement

'सत्ता आली पण पत्ता गेला', सुमीत राघवनचा शिवसेनेला टोला

गेल्या काही दिवसांत चाललेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सर्व घटनांवर अभिनेता सुमीत राघवननं ट्वीटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

'सत्ता आली पण पत्ता गेला', सुमीत राघवनचा शिवसेनेला टोला
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्कवर होणार आहे. गेल्या काही दिवसांत चाललेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सर्व घटनांवर अभिनेता सुमीत राघवननं ट्वीटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे

गड आला पण सिंह गेला, पण आज म्हणावं लागेल.. सत्ता आली पण पत्ता गेला, मातोश्री ते सिल्व्हर ओक’, असं ट्विट करत सुमीतनं ‘बाळासाहेब ठाकरे’ असा हॅशटॅग वापरला आहे.

तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यानं शुभेच्छा दिल्या आहेत. "पण एक मतदार म्हणून मला माझी फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे. मी महायुतीला मत दिलं होतं महाविकासआघाडीला नाही", अशा शब्दांत त्यानं नाराजी व्यक्त केली.

याआधी देखील सुमीत राघवननं महाविकासआघाडीवर निशाना साधला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. यावरून सुमीतनं ट्वीट केलं होतं की, ट्रायडंट, ललीत, हयात या हॉटेलच्या मेन्यूमध्ये खिचडी नाही. पण हॉटेलचं बील कोण भरणार, कदाचित शेतकरी, असं ट्वीट केलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेऊन भाजपाला पाठिंबा देत शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच भूकंप झाला

पण ज्या आमदारांच्या पाठिंब्यानंतर सत्ता स्थापन करण्यात आली ते आमदार एक-एक करून पुन्हा राष्ट्रवादीत आले. आम्ही शरद पवार यांच्यासोबतच आहोत, असं या आमदारांकडून स्पष्ट करण्यात आलं. फक्त अजित पवार एकटे राहिले होते. त्यांची देखील राष्ट्रवादीकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर सुप्रिया ताई सुळे यांचे पती सदानंद सुळे आणि शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिला. अजित पवार यांच्या राजिनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.   



हेही वाचा

म्हणून उद्धव ठाकरेंनी सोडलं ‘सामना’चं संपादकपद!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा