Advertisement

म्हणून उद्धव ठाकरेंनी सोडलं ‘सामना’चं संपादकपद!

शिवाजी पार्कवर ​मुख्यमंत्रीपदाची शपथ​​​ घेण्याच्या तयारीत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’चं संपादकपद सोडलं आहे.

म्हणून उद्धव ठाकरेंनी सोडलं ‘सामना’चं संपादकपद!
SHARES

शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या तयारीत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’चं संपादकपद सोडलं आहे. त्यामुळं यापुढं या वृत्तपत्राची संपूर्ण जबाबदारी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडे असणार आहे.

हेही वाचा- शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंचे मोदींना निमित्रंण

‘सामना’तील अग्रलेखात छापून येणारा मजकूर ही उद्धव ठाकरे किंबहुना शिवसेनेची अधिकृत भूमिका समजली जाते. या अग्रलेखांद्वारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरोधकांवर कडाडून टीका केली. त्यामुळे दररोज सामनात छापून येणाऱ्या अग्रलेखाकडे देशभरातील प्रसारमाध्यमाचं लक्ष असतं. 

सामनातील अग्रलेखांद्वारे रोखठोक भूमिका मांडण्याची ही जबाबदारी खऱ्या अर्थाने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावरच आहे. परंतु यापुढं सामनाच्या अग्रलेखात छापून येणाऱ्या मजकूराची सर्व जबाबदारी राऊतांवरच असेल. 


हेही वाचा- 

शपथविधीला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 2 हजार पोलिस तैनात

अजित पवारांची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा