अजित पवारांची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी

भाजपच्या गोटात जाऊन पुन्हा घरवापसी केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ​अजित पवार​​​ यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.

SHARE

भाजपच्या गोटात जाऊन पुन्हा घरवापसी केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यास आघाडीतील इतर पक्षांची त्यास कुठलीही हरकत नसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 हेही वाचा- मी राष्ट्रवादीतच होतो आणि आहे, अजित पवारांचा खुलासा

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून भाजपसोबत गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. अजित पवार यांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापना केली. फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कुटुंबीयांची मनधरणी फळली आणि अवघ्या ८० तासांतच अजित पवार राजीनामा देऊन स्वगृही परतले. त्यानंतर त्यांनी सर्वात पहिल्यांदा सिल्व्हर ओक इथं जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि बुधवारी सकाळी आमदारकीची शपथही घेतली. त्याआधी सुप्रिया सुळेंसोबत प्रसारमाध्यमांना त्यांनी फोटोसाठी पोझही दिली.

हेही वाचा- भाऊ बहिणीची गळाभेट, विधानसभेत सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचं स्वागत

दुपारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांना अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत आपलं पक्षातील स्थान कायम असल्याचे संकेतही त्यांनी दिले. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करायचं की नाही ही राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं म्हणत काँग्रेस आणि शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.हेही वाचा-

सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले, खडसेंचा भाजपला घरचा आहेर

गुगल सर्चमध्ये अजितदादाच; शरद पवार, फडणवीसांना टाकलं मागेसंबंधित विषय
ताज्या बातम्या