Advertisement

'हा' आहे ठाकरे आडनावामागील इतिहास

तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही की उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं खरं आडणाव हे ठाकरे नाही. जाणून घ्या काय आहे त्यांच्या आडणावामागील इतिहास

'हा' आहे ठाकरे आडनावामागील इतिहास
SHARES

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न अखेर गुरुवारी पूर्ण होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबियांचा एक दबदबा आहे. पण अनेकांना माहिती नसेल की ठाकरे हे त्यांचं मूळ आडनाव नाही. या त्यांच्या आडनावामागचा इतिहास आपण जाणून घेऊया. 

तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही की उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं खरं आडनाव हे ठाकरे नाही तर धोडपकर आहे. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी आडनावात ठाकरे (Thackeray) हा शब्द लावला होता.


ठाकरे नाही तर धोडपकर

प्रबोधनकारांच्या आत्मकथेत म्हटलं आहे की, त्यांचे पुर्वज धोडप किल्ल्याचे किल्लेदार होते. तेव्हा त्यांचे आडनाव धोडपकर होते. केशव सिताराम ठाकरेंचे पणजोबा कृष्ण माधव धोडपकर हे रायगड जिल्ह्यातील पाली इथं राहत होते. प्रबोधनकारांचे आजोबा रामचंद्र धोडपकर हे पनवेलमध्ये राहिले तेव्हापासून पनवेलकर हे आडनाव त्यांनी लावले. प्रबोधनकारसुद्धा सुरुवातीला पनवेलकर असं आडनाव लावत होते पण नंतर त्यांनी स्वत: ठाकरे असं आडनाव केलं.


आडनावामागील इतिहास

तुम्ही कधी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सोशल मीडियावरील आडनावावर नजर टाकली आहे का? त्यात तुम्हाला ठाकरे आडनावाचं स्पेलिंग थोडं वेगळं दिसेल. स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार थॅकरे असा होतो. आता असं नाव लिहिण्यामागे आणखी एक गोष्ट आहे.


आडनावाच्या स्पेलिंगमध्ये बदल 

प्रबोधनकार ठाकरे हे भारतात जन्मलेल्या विल्यम मेकपीस थॅकरे (William Makepeace Thackeray) यांचे चाहते होते. त्यांचीच प्रेरणा घेऊन नावापुढे Thackeray हा शब्द जोडला. विल्यम थॅकरे प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार होते. त्यांचा जन्म कोलकातात १७८१ मध्ये झाला होता. त्यांचे वडील इस्ट इंडिया कंपनीत सचिव होते. थॅकरे यांच्या कथा-कादंबरी यावर अनेक मालिका आणि चित्रपटही आले होते.



हेही वाचा

'सत्ता आली पण पत्ता गेला', सुमीत राघवनचा शिवसेनेला टोला

ठरलं! राज ठाकरे शपथविधीला जाणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा