Advertisement

विधानसभा निवडणूक: ८० कोटींचा मुद्देमाल भरारी पथकाकडून हस्तगत

इव्हिम विरोधात सुरू असलेला चुकीचा प्रचार रोखण्यासाठी इव्हिएम विरोधात अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.

विधानसभा निवडणूक: ८० कोटींचा मुद्देमाल भरारी पथकाकडून हस्तगत
SHARES
Advertisement

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांच्या भरारी पथकाने राज्यभरात आतापर्यंत तब्बल ८० कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, सोने व चांदीचे दागिने आदींचा समावेश आहे. 

विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे, मद्य, आकर्षक भेटवस्तू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान दागिन्यांचं आमिष दाखवलं जातं. अशा उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठी यावर्षी प्रथमच राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० पथके राज्यभरात स्थापन केली आहेत. स्थानिक पोलिस उपायुक्त आणि ग्रामीण विभागात एसपींच्या मार्गदर्शनाखाली ही पथके कार्यरत आहेत.

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई सुरू केली आहे. यासोबत अवैध शस्त्र बाळगणे, मद्य वाहतूक-विक्री आदींप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहे. आतापर्यंत या भरारी पथकांनी राज्यांत एकूण ८० कोटी ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात २६ कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम, तर १६ कोटी ६९ लाख रुपयांच्या अवैध दारूचा समावेश आहे. तसंच भरारी पथकाने १७ कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि १९ कोटींचे सोेने व चांदीचे दागिने पकडले आहेत. निवडणुकीत मतदारांना पैशांचं प्रलोभन दाखविलं जाऊ शकतं. हे प्रकार रोखण्यासाठी झोपडपट्टी वा इतर परिसरात नजर ठेवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण झाली आहे. २८८ मतदारसंघात ९६ हजारपेक्षा जास्त मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.  यंदाची संपूर्ण निवडणूक ईव्हीएमवरच होणार आहे.  ईव्हीएम मशीनबाबत कोणतीही खराबी नसल्याचंही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे इव्हीएमविरोधातील अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. हेही वाचा- 

संबंधित विषय
Advertisement