Advertisement

राज ठाकरेंकडून आदित्यच्या निर्णयाचं स्वागत


राज ठाकरेंकडून आदित्यच्या निर्णयाचं स्वागत
SHARES

यंदा राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढत असून, ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. दरम्यान आदित्य यांच्या उमेदवारीवर त्यांचे काका, म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत आदित्य यांच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. 'आदित्य माझे आशीर्वाद घेण्यासाठी आला नसला तरी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत’, असं राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

राजकारणात पहिलं पाऊल

आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवत असल्यानं आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती प्रथमच निवडणूक लढवत आहे. त्यामुळं पुतण्या राजकारणात पहिलं पाऊल ठेवत असताना राज यांनी जाणीवपूर्वक आदित्य यांच्याविरुद्ध वरळी मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच आभार व्यक्त केलं असताना आता राज यांनी आदित्य यांच्या निर्णयाचं उघडपणे समर्थन केलं व उद्या माझा मुलगा निवडणूक लढवायची आहे, असं म्हणाला तर मी त्यालाही नाही म्हणणार नाही, असंही राज यांनी महटलं.

चुकीचं काय?

आदित्य निवडणूक लढवत असेल तर त्यात चुकीचं काय? तसंच बाळासाहेब हे व्यंगचित्रकार होते. हाताचं वळण बिघडेल म्हणून आजोबांनी त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये पाठवलं नाही. पण बाळासाहेबांचं सांगायचं तर मला आणि उद्धवला त्यांनी कधीच रोखलं नाही. आमच्यावर त्यांनी काहीही लादलं नाही. आमच्या मुलांच्या बाबतीतही तेच आहे.ते एखादा निर्णय घेत असतील तर त्यांना आम्ही रोखणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

योग्य भूमिका

त्याशिवाय, 'आदित्य माझ्याबद्दल काय विचार करतो,मला माहीत नाही. पण माझं म्हणाल तर मी त्याच्याबाबत योग्य भूमिका घेतली आहे. प्रत्येकाचं स्वत:चं एक मत असतं. आदित्यनं स्वत:हून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे समर्थनीयच आहे’, असंही राज यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.



हेही वाचा -

राज ठाकरे म्हणजे मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन- अमृता फडणवीस

पीएमसी बँक घोटाळ्यातील माजी अध्यक्षाकडं 'इतकी' संपत्ती



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा