Advertisement

पीएमसी बँक घोटाळ्यातील माजी अध्यक्षाकडं 'इतकी' संपत्ती

माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याने एचडीआयएलच्या काही संबंधीत कंपन्यांच्या खात्यातून पैसे काढले व ती रक्कम मग हवाला मार्फत दुबईतील मेहता नावाच्या व्यक्तीला पाठवण्यात आली. त्यानंतर तीच रक्कम बॅंकेत जमा करण्यात आली.

पीएमसी बँक घोटाळ्यातील माजी अध्यक्षाकडं 'इतकी' संपत्ती
SHARES

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंके गैरव्यवहार प्रकरणी बॅंकेचा माजी अध्यक्ष वरीयाम सिंग याची कोट्यावधींची मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासात निष्पन्न झाली आहे. जुहू बीच परिसरात २५०० कोटींची मालमत्ता आहे. याशिवाय पंजाबमध्येही सिंग यानं लेमन ट्री नावाचं पंचतारांकित हॉटेल विकत घेतलं आहे. हा व्यवहार मनमोहन अहुजा नावाच्या व्यक्ती मार्फत झाला असून, पोलिस चौकशीसाठी त्याचा शोध घेत आहेत. हरियाणा व हिमाचल प्रदेशातही काही मालमत्ता विकत घेतल्याचं सांगितलं. याबाबत सिंग याची चौकशी केली असता त्यानं कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

खोटी कागदपत्रं

रिझर्व्ह बॅंकेनं नेमलेले प्रशासक जसबीरसिंग मठ्ठा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हेच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात पीएमसी बॅंकेचं निलंबित संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वरियाम सिंग, इतर अधिकारी, एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवा व सारंग वाधवा यांना अटक करण्यात आली. या घोटाळ्याची रक्कम शंभर कोटीच्यावर असल्यामुळं ईडीनं ही गुन्हा नोंदवत स्वतंत्र तपासाला सुरूवात केली. कट रचून खोटी कागदपत्रं तयार करणं आणि त्यांचा फसवणुकीसाठी वापर करणं या कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

रक्कम बॅंकेत जमा

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक आरोपींकडं केलेल्या चौकशीत बॅंकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमसनं एचडीआयएलच्या काही संबंधीत कंपन्यांच्या खात्यातून पैसे काढले व ती रक्कम मग हवाला मार्फत दुबईतील मेहता नावाच्या व्यक्तीला पाठवण्यात आली. त्यानंतर तीच रक्कम बॅंकेत जमा करण्यात आली. अशा मार्फत गैरव्यवहारातील रक्कम व्यवहारात आणण्यात आल्याचं थॉमस याच्या चौकशीत पुढे आलं आहे. याशिवाय थॉमसच्या पुण्यात ९ मालमत्ता असल्याचंही समजलं आहे. पोलीस त्याची पडताळणी करत आहे.

या प्रकरणातील ४४ संशयास्पद खात्यांपैकी १० खाती एचडीआयएल समूहाशी संबंधित आहेत. या खात्यांमधील गैरव्यवहार लपवण्यासाठी सुमारे २१ हजार बनावट खाती निर्माण करण्यात आली होती. या खात्यांना बॅंकेतील निष्क्रिय (डॉर्मंट) खात्यांच्या धारकांची नावे देण्यात आली होती. हीच खाती सुरुवातीला रिझर्व्ह बॅंकेला दाखवण्यात आली होती. या खात्यांद्वारे ४३५५ कोटींचं मुद्दल व व्याज बुडवण्यात आल्याचं दाखवण्यात आलं. या पूर्वी ईडीनं (सक्तवसुली संचालनालय) एकूण ३,८३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये एचडीआयएलच्या प्रवर्तकांची २ विमानं, महागड्या कार, क्रूझ आदींचा समावेश आहे,हेही वाचा -

मान्सूनची मुंबईतून माघार, मुंबईकर उकाड्यानं हैराण

जनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडणार पारदर्शक डबासंबंधित विषय
Advertisement