Advertisement

जनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडणार पारदर्शक डबा

प्रवाशांना आता जनशताब्दी एक्स्प्रेसच्या पारदर्शक डब्यातून प्रवासाचा अनुभव करता येणार आहे.

जनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडणार पारदर्शक डबा
SHARES

दिवाळीच्या सुट्टीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण प्रवाशांना आता जनशताब्दी एक्स्प्रेसच्या पारदर्शक डब्यातून प्रवासाचा अनुभव करता येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून हा पारदर्शक डबा प्रवाशांच्या सेवेत नव्हता. त्यामुळं प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. परंतु, आता हा पारदर्शक डबा जनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. त्यामुळं आता प्रवाशांना असलेली पारदर्शक डब्याची प्रतिक्षा आता संपणार आहे. 

निसर्गाचं सौंदर्य

प्रवाशांना आता कोकणातील निसर्गाचं सौंदर्य न्याहाळत प्रवास करणं शक्य होणार आहे. पारदर्शी छत, मोठ्या आकाराच्या खिडक्या, डब्यात सेल्फी पॉइंट, स्वयंचलित दरवाजे आणि आरामदायी आसनं असे वैशिष्ट्यं असलेला विस्टाडोम डबा अल्पावधीत प्रवाशांच्या पसंतीस उतरला होता. मोठ्या आकाराच्या खिडक्यांमुळं धावत्या ट्रेनमधूनच निसर्गसौंदर्य मोबाइलमध्ये सहज टिपणं शक्य होतं. पारदर्शी छतामुळं बोगद्यातील विजेच्या दिव्यांचा लपंडाव पाहायला मिळणार आहे. 

डब्यांचं नूतनीकरण

सप्टेंबर २०१७ मध्ये मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता. रेल्वे कारखान्यातून मुंबईत आल्यानंतर या डब्यांचं नूतनीकरण व देखभाल झालेली नव्हती. त्यामुळं सप्टेंबरमध्ये हा डबा नूतनीकरणासाठी माटुंगा रेल्वे कारखान्यात पाठविण्यात आला होता. सद्यस्थितीत डब्याच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.

नव्या रूपात विस्टाडोम

ऑक्टोबरअखेर नव्या रूपात विस्टाडोम पुन्हा जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात येणार आहे. यानूतनीकरणात आसनांची गादी बदलणं, पडदे बदलणं, आवश्यक तेथे रंगरंगोटी, पारदर्शी छताची स्वच्छता आणि अन्य तांत्रिक कामं करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा वाढली

क्रेडिट, डेबिट कार्ड वापरताय? मग फसवले जाऊ नये म्हणून ५ मुद्दे लक्षात ठेवा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा