Advertisement

मान्सूनची मुंबईतून माघार, मुंबईकर उकाड्यानं हैराण

मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या पावसानं मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे.

मान्सूनची मुंबईतून माघार, मुंबईकर उकाड्यानं हैराण
SHARES
Advertisement

मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या पावसानं मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहेपावसाच्या विश्रांतीनंतर मुंबईकरांना ऑक्टोबर हीटची जाणीव होऊ लागली आहेत्यामुळं मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोआहेत्याचप्रमाणं मान्सूननंही मुंबईमधून सोमवारी माघार घेतली आहे.

सुटकेचा निश्वास

मुंबईतून मान्सूननं माघार घेतल्यानं अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडलाकारण राज्यामध्ये यंदा पडलेल्या मुसळधाप पावसामुळं अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. तासभर पडलेल्या पावसामध्ये मुंबई-पुण्यातील नागरिकांनी कहर अनुभवला असूनअखेर १४ दिवसांनी उशिरा मुंबईतून मान्सून परतला आहे.

परतीच्या प्रवासाला सुरुवात

राजस्थानमधून यंदा पावसानं ९ ऑक्टोबरला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.त्यानंतरमात्र परतीचा प्रवास वेगानं झालाअवघ्या ६ दिवसांत मान्सून मुंबईतून बाहेर पडला आहेरविवारी परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या सीमारेषेवर होतात्यानंतर २४ तासांमध्ये पावसानं मुंबईची सीमारेषा ओलांडली.

विदर्भातून माघार

रविवार ते सोमवार या काळामध्ये मान्सूनने गुजरातमध्य प्रदेशमुंबईसह दक्षिण कोकणाचा काही भागमध्य महाराष्ट्रमराठवाड्याचा काही भाग आणि संपूर्ण विदर्भातून माघार घेतलीनैऋत्य मान्सूनची माघार सुरू असताना दुसरीकडे ईशान्येकडून येणाऱ्या पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.

उकाड्यानं हैराण

मान्सूननं माघार घेतल्यानंतर मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे.पाऊसही तुरळक ठिकाणीच आपली उपस्थिती नोंदवत होतासोमवारीही मुंबईचे कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंहे तापमान सरासरी तापमानाहून तब्बल २.९ अंशांनी अधिक आहेतर कुलाबा इथं कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस होतंहे तापमानही सरासरीहून २.१ अंशांनी अधिक होते.हेही वाचा -

पीएमसी प्रकरणी ३,८३० कोटींची मालमत्ता जप्त

दहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवातसंबंधित विषय
Advertisement