पीएमसी प्रकरणी ३,८३० कोटींची मालमत्ता जप्त

पीएमसी बँकेतील कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (सक्तवसुली संचालनालय) एकूण ३ हजार ८३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

पीएमसी प्रकरणी ३,८३० कोटींची मालमत्ता जप्त
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील(पीएमसी) कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (सक्तवसुली संचालनालय) एकूण ३ हजार ८३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये एचडीआयएलच्या प्रवर्तकांची २ विमानं, महागड्या कार, क्रूझ आदीचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

मालमत्तेचं मूल्यांकन

जप्त करण्यात आलेल्या चल व अचल मालमत्तेचं मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर काळा पैसा रोधक कायद्यातील (पीएमएलए) तरतुदींनुसार या मालमत्तांवर टाच आणली जाणार आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले एचडीआयएलचं वाधवान पितापुत्र, पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग यांची पोलिस कोठडी १६ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.

४० हजार रुपये

पीएमसी बँकेच्या खातेदारांना ६ महिन्यांच्या कालावधीत आपल्या खात्यांतून एकूण ४० हजार रुपये काढता येणार आहेत. याबाबत रिझर्व्ह बँकेनं सोमवारी माहिती दिली असून, बँकेवर निर्बंध घालताना ही मर्यादा १० हजार रुपये निर्धारित करण्यात आली होती. त्यानंतर ती २५ हजार रुपये करण्यात आली.हेही वाचा -

दहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात

जनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडणार पारदर्शक डबासंबंधित विषय