Advertisement

दहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचं अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.

दहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात
SHARES

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचं अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. नियमित विद्यार्थ्यांचं अर्ज ५ नोव्हेंबरपर्यंत तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी,श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरायचे आहेत.

परीक्षेचे अर्ज

विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in अथवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेतदहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांना सरल डेटाबेसवरून भरणं आवश्यक असल्यानं त्यांची 'सरल'वर नोंद करणं आवश्यक असल्याचं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा शुल्क माफ

पुनर्परिक्षार्थी, खासगी विद्यार्थी,श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचं अर्ज प्रचलित पद्धतीनं शाळांनी भरायची आहेत. दुष्काळग्रस्त भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.हेही वाचा -

जनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडणार पारदर्शक डबा

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा वाढलीसंबंधित विषय
Advertisement