Advertisement

राज ठाकरे म्हणजे मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन- अमृता फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे म्हणजे मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन- अमृता फडणवीस
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी 'राज ठाकरे म्हणजे मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन' असल्याचं म्हटलं. अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं असून, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मोठे बंधु

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांना राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी 'राज ठाकरे म्हणजे मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन' असल्याचं उत्तर दिलं. त्याशिवाय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोठया बंधु समान असल्याचंही अमृता यांनी म्हटलं.

अभी तो में जवान हूँ

या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, त्या प्रश्नावर 'या वयात शरद पवार काम करत आहेत. त्यांना ‘अभी तो में जवान हूँ’ हे गाणे सूट होते', असं म्हटलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. हेही वाचा - 

मान्सूनची मुंबईतून माघार, मुंबईकर उकाड्यानं हैराण

पीएमसी प्रकरणी ३,८३० कोटींची मालमत्ता जप्तRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement