नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन

माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांंचा स्वाभिमान पक्ष मंगळवारी भाजपात विलीन झाला आहे. कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाभिमान पक्ष विलीन करण्याबरोबरच नितेश राणे आणि निलेश राणे यांनीही भाजपात प्रवेश केला.

SHARE

माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांंचा स्वाभिमान पक्ष मंगळवारी भाजपात विलीन झाला आहे. कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाभिमान पक्ष विलीन करण्याबरोबरच नितेश राणे आणि निलेश राणे यांनीही भाजपात प्रवेश केला. कणकवली मतदारसंघातून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मंगळवारी कणकवलीत आले होते. यावेळी माझ्यासह निलेश, नितेश यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला असं मी जाहीर करतो, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती असली तरी कणकवलीत दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत. नितेश राणे  कणकवलीतून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. नितेश राणे यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणे राज्यसभेत भाजपाचे खासदार आहेत. ते पक्षात आलेच होते हे मी सगळ्यांना सांगत होतो. आज त्यांच्या स्वाभिमान संघटनेच्या  सगळ्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. 

मी आमदार असताना नारायण राणे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा पुढेही आम्हाला होणार आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हेही वाचा -

राज ठाकरेंकडून आदित्यच्या निर्णयाचं स्वागत

मनसेनं सत्तेच्या बाहेर असून जे करून दाखवलंय, ते सत्ताधाऱ्यांनाही जमलेलं नाही- संदीप देशपांडे
संबंधित विषय
ताज्या बातम्या