Advertisement

महात्मा गांधी जयंती २०१९ : बापूंच्या या '१२' गोष्टी जगासमोर उजागर झाल्या नाहीत

आज महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात बापूंसंदर्भात अशा काही गोष्टी ज्या कधी ऐकण्यात नसतील.

महात्मा गांधी जयंती २०१९ : बापूंच्या या '१२' गोष्टी जगासमोर उजागर झाल्या नाहीत
SHARES

२ ऑक्टोबर १८६९ साली जन्मलेल्या मोहनदास करमचंद गांधीजींची वयाच्या ७९ व्या वर्षी म्हणजेच ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली. आज महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात बापूंसंदर्भात अशा काही गोष्टी ज्या कधी ऐकण्यात नसतील

) गांधीजींनी बोअर युद्धादरम्यान सैन्यात सेवा केली होती. पण युद्धाच्या भयानक संकल्पना लक्षात येताच त्यांनी हिंसेविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. इथूनच गांधीजींचा हिंसेविरुद्ध लढा सुरू झाला.

) एकदा रेल्वे प्रवासा दरम्यान महात्मा गांधींचा एक बुट खाली पडला. त्यांनी त्याच क्षणी दुसरा बुट देखील खाली फेकून दिला. एका प्रवाश्यानं कारण विचारल्यावर ते म्हणाले, एक बुट माझ्या काही कामाचा नव्हता. पण ज्याला सापडेल त्याला दोन्ही पायातील बुट मिळतील. कमीत कमी ते बुट त्याच्या तरी कामाला येतील.

) गांधीजी यांच्या जीवनातील ४० वर्ष, दररोज साधारण १८ किलोमीटर चालले. त्यांनी १९१३ ते १९३८ एवढ्या कालावधीत ७९,००० किमी अंतर पायी कापलं. हे अंतर पृथ्वीला दोनदा प्रदक्षिणा मारल्याइतं होईल.

) जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या कार्यासाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पारितोषिकासाठी गांधीजींना एक-दोन नव्हे तर पाच वेळा नामांकन मिळाले आहे. परंतु नोबेल हा पुरस्कार आतापर्यंत मरणोत्तर कुणालाही देण्यात आला नाही. त्यामुळे गांधीजींना नोबेल देण्यात आला नाही याबद्दल नोबेल समितीनं दिलगिरी व्यक्त केली.

) गांधीजी १९३० मध्ये प्रसिष्ठित टाईम मॅगझीनच्या मुखपृष्ठावर 'टाईम पर्सन ऑफ द ईयर' म्हणून झळकले होते. त्यावेळी इतर कुठलाही भारतीय टाईम पर्सन ऑफ द ईयर या मानानं सन्मानित झाला नव्हता.

) गांधी यांनी तब्बल ४ महाद्वीप आणि १२ देशातील नागरिक हक्क चळवळ घडून आणली.

) मार्टिन लूथर किंग हे ज्यूनियर हे महात्मा गांधींपासून प्रेरीत होते. १९५५-५६ साली मार्टिन यांनी पुकारलेलं आंदोलन हे महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि सत्याग्रह यांपासून प्रेरीत होते.

) स्टीव्ह जॉब्स हे महात्मा गांधी यांचे चाहते होते. गांधीजींच्या चष्म्यासारखाच चष्मा स्टीव्ह जॉब्स यांनी बनवून घेतला होता.

) ब्रिटन, या देशाविरुद्ध गांधीजीनी स्वातंत्र्यासाठीचा लढा दिला. याच देशानं गांधीजींच्या मृत्यूनंतर २१ वर्षानी त्यांच्या नावानं टपाल तिकीट छापलं आहे.

१०) महात्मा गांधी यांच्या हत्येआधी ते काँग्रेस पक्ष बरखास्त करण्याचा गांभीर्यानं विचार करत होते.


११) भारतातील ५३ आणि परदेशातील ४८ रोड हे महात्मा गांधींच्या नावानं ओळखले जातात.

१२) महात्मा गांधीजींची अंत्ययातत्रेसाठी तब्बल 8 किलोमीटर लांब पर्यंत लोकांची गर्दी होती.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा