Advertisement

मोदींशी तुलना हा शिवाजी महाराजांचा सन्मानच, भाजप नेता बरळला


मोदींशी तुलना हा शिवाजी महाराजांचा सन्मानच, भाजप नेता बरळला
SHARES

‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून सुरू असलेला वाद शमण्याची चिन्हे दिसत असताना एका भाजप नेत्याने बेताल वक्तव्य करत या वादात पुन्हा एकदा तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली तुलना म्हणजे महाराजांचा सन्मानच असल्याचं हा नेता बरळला आहे. 

हेही वाचा- जुनी मढी उकरू नका, वादग्रस्त पुस्तकावरून शिवसेनेचं नमतं

भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. पंतप्रधान मोदी आणि शिवाजी महाराजांच्या कामात साम्य असल्याचा दावाही हळवणकर यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी आणि शिवाजी महाराजांची तुलना करण्यात काहीच गैर नाही. या पुस्तकाच्या लेखकाचं मी समर्थनच करतो. ही तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानच आहे, असं मत हळवणकरांनी भाजपच्या बैठकीत बोलताना व्यक्त केलं.

त्याआधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लिखाणाचा काय अर्थ निघू शकतो, याचा विचार करूनच लेखकाने लिखाण केलं पाहिजे, असं म्हणत या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांना घरचा आहेर दिला होता. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत असून त्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले होते.

दरम्यान हे पुस्तक मागे घेण्यात आल्याने प्रकरण शांत होण्याची चिन्हे असतानाच हळवणकरांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा- मुलाचं नाव शिवाजी ठेवण्याआधी साताऱ्यातून एनओसी घ्यायची का? जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना प्रश्न

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा