जुनी मढी उकरू नका, वादग्रस्त पुस्तकावरून शिवसेनेचं नमतं

या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरून काढू नयेत हीच अपेक्षा आहे,' असं आवाहन शिवसेनेने केलं आहे.

SHARE

छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावरून शिवरायांच्या वंशजांना डिवचल्यावर उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर कडक शब्दांत हल्ला चढवला होता. त्यानंतर नमतं घेत या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरून काढू नयेत हीच अपेक्षा आहे,' असं आवाहन शिवसेनेने केलं आहे.

‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ही तुलना शिवरायांच्या वंशजांना मान्य आहे का? यावर त्यांनीच बोलाव, असं म्हणत मार्मिकपणे टोमणा हाणला होता. 

हेही वाचा- झोपडपट्टी धारकांना ५०० चौ.फूट घर द्या- अस्लम शेख

यनराजेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून   शिवसेनेच्या स्थापनेवेळी 'शिवसेना' हे नाव ठेवताना शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का? वडापावला शिवाजी महाराजांचं नाव का दिलं? असे अनेक प्रश्न उदयनराजे यांनी उपस्थित केले होते. त्यावर उदयनराजे यांचं नाव न घेता शिवसेनेने मुखपत्र असलेल्या 'सामना'तून सारवासारव केली आहे. 

शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी व शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न जेव्हा जेव्हा उभा राहिला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र खडबडून जागा झाला व पेटून उठला. पंडित नेहरू असतील, नाहीतर मोरारजी देसाई, सगळ्यांनाच शिवरायांपुढे नतमस्तक व्हावे लागले. आताही तेच झाले. ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरून काढू नयेत हीच अपेक्षा आहे, असं शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

हेही वाचा- ईस्टर्न फ्री वेला विलासराव देशमुखांचं नाव

संबंधित विषय
ताज्या बातम्या