SHARE

मुंबईतील 'ईस्टर्न फ्री वे' हा वाहतूकीसाठी महत्वाचा रस्ता असून, या 'ईस्टर्न फ्री वे'ला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येणार आहे. त्यानुसार, विलासराव देशमुख यांचं नाव देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नगरविकास विभागाला केली. राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसूलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

दक्षिण मुंबईतील पी डिमेलो रोड ते पूर्व द्रुतगती महामार्गाला चेंबूरपर्यंत जोडणारा हा मार्ग १६.८ किमी लांबीचा आहे. यामुळे पुणे आणि गोव्यातून दक्षिण मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतबाहेर जाणाऱ्या वाहनांना जलदगतीने पोहोचता येते. दरम्यान, मंगळावारी झालेल्या परिवहन विभागाच्या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील परिवहन सेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या आहेत.

दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री या नात्यानं तत्कालीन आघाडी सरकारच्या राजवटीत मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसंच, 'ईस्टर्न फ्री वे'च्या उभारणीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन 'ईस्टर्न फ्री वे'ला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी सूचना अजित पवार यांनी या बैठकीत केली. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या जेएनआरएमयू १४३६ कोटी रुपयांचा अंदाजित खर्चाचा हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत १४ जून २०१३ रोजी जनतेसाठी खुला करण्यात आला आहे.हेही वाचा -

मेट्रो-३ प्रकल्पातील 'इतक्या' स्थानकांचं खोदकाम १०० टक्के पूर्ण

टॅक्सी इंडिकेटरची सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारासंबंधित विषय
ताज्या बातम्या