Advertisement

मुलाचं नाव शिवाजी ठेवण्याआधी साताऱ्यातून एनओसी घ्यायची का? जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच महाराष्ट्रातील ‘जाणता राजा’ असल्याचं प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांना दिलं.

मुलाचं नाव शिवाजी ठेवण्याआधी साताऱ्यातून एनओसी घ्यायची का? जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना प्रश्न
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच महाराष्ट्रातील ‘जाणता राजा’ असल्याचं प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांना दिलं. 

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणारं पुस्तक ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी…’ प्रकाशित झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना उत आला आहे. आपल्याकडे त्या सो कॉल्ड जाणत्या राजांना ही उपमा कुणी दिली माहीत नाही. पण जगाच्या पाठिवर छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव ‘जाणता राजा’ आहेत, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली होती.  

हेही वाचा- ‘जाणता राजा’ एकच, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला


त्याला व्हिडिओद्वारे उत्तर देताना आव्हाड म्हणाले, होय शरद पवार हेच महाराष्ट्रातील ‘जाणता राजा’ आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव, अद्वितीय नेता म्हणजेच शरद पवार. इथला पाणीप्रश्न, शेतीचा प्रश्न, राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, नागरी वस्तीतले प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न, प्रश्नाची मालिका सांगा प्रत्येक प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांच्याकडे आहेत. म्हणून त्यांना ‘जाणता राजा’ म्हणतात. शरद पवार यांची करंगळी पकडून ज्याप्रकारे अनेकजण राजकारणात आले. तसेच त्यांच्यावर टीका करूनही अनेकजण हेडलाइन्समध्ये आले, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंना लगावला.

शिवसेना स्थापन करण्याआधी शिवरायांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न उदयनराजेंनी आपल्या पत्रकार परिषदेतून शिवसेनेला विचारला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कुणाच्या घरात एखाद्याने आपल्या मुलाचं नाव शिवाजी ठेवलं, तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जात असल्याचंही आव्हाड यावेळी म्हणाले. 

हेही वाचा- तर, शिवसेना नाव बदलून ठाकरे सेना करा, उदयराजेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा