Advertisement

‘महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’, मनसेचं पहिलं भगवं पोस्टर शिवसेनाभवनसमोर

मनसेने शिवसेना भवनासमोर एक पोस्टर लावलं असून या पोस्टरवर ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं लिहिण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर भगव्या रंगात रंगवण्यात आलं आहे.

‘महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’, मनसेचं पहिलं भगवं पोस्टर शिवसेनाभवनसमोर
SHARES

आपल्या पहिल्या वहिल्या महाअधिवेशनाआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) नव्या राजकीय रंगात रंगताना दिसून येत आहे. मनसेने शिवसेना भवनासमोर (shiv sena bhavan) एक पोस्टर लावलं असून या पोस्टरवर ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं लिहिण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर भगव्या (saffron poster) रंगात रंगवण्यात आलं आहे. 

हेही वाचा- तर, राऊत कुठंतरी कारकुनी करत असते, मनसेच्या ‘या’ नेत्याने लगावला टोला

येत्या २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) यांची जयंती असून याच दिवशी मनसेने आपल्या पहिल्या महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे. बाळासाहेबांच्या जयंतीला मनसे (mns) आणि शिवसेना (shiv sena) दोन्ही पक्ष आपल्या परिने शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मनसैनिकांनी लावलेले हे पोस्टर याचीच झलक असल्याचं म्हटलं जात आहे.  

यावर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) म्हणाले, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकटे आली, तेव्हा तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) आणि मनसे नेहमीच ठामपणे उभे राहिलेत. मग तो दहिहंडीच्या उंचीचा प्रश्न असो किंवा गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाचा किंवा रझा अकादमीने घातलेल्या हैदोसाचा. मनसे महाराष्ट्रातील जनतेच्या पाठिशी उभी असल्याचा संदेश या पोस्टरमधून देण्यात आला आहे. हे पोस्टर कुणालाही डिवचण्यासाठी नाही, तर भूमिका स्पष्ट करण्यासाठी लावलेले आहे.  

हेही वाचा- संजय राऊत यांना पदावरून काढा- संभाजी भिडे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा