Advertisement

मनसेचा दणका, वाडियाला ४६ कोटींचं अनुदान देण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन


मनसेचा दणका, वाडियाला ४६ कोटींचं अनुदान देण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन
SHARES

मुंबई महापालिका आणि वाडिया रुग्णालय प्रशासनाच्या वादात रुग्णांचे हाल होत असल्याने हे रुग्णालय बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याविरोधात लालबावटा कामगार संघटनेने छेडलेल्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील सहभागी झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन अखेर राज्य सरकारने या रुग्णालयाला ४६ कोटी रुपयांचं अनुदान देण्याचं ठरवल्याची माहिती शर्मिला ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.  

मुंबई महापालिका आणि राज्य शासनाकडून वाडिया रुग्णालयासाठी दिला जाणारा निधी थकल्याने वाडिया रुग्णालयाचा कारभार डबघाईस आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. तर महापालिकेकडे रुग्णालयाचा कुठलाही निधी थकलेला नसल्याचा खुलासा महापालिकेने केला आहे. मात्र मागील आठवड्यापासून वाडिया रुग्णालयाने नव्या रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रिया थांबवल्याचा फटका रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना बसत आहे. 

हेही वाचा- आमचे हात जोडलेलेच राहू द्या, वाडियाप्रकरणी शर्मिला ठाकरेंचा सरकारला इशारा

त्याविरोधात लाल बावटा कामगार संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सहभागी होऊन काहीही झालं तरी वाडिया हॉस्पीटल बंद होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मनसेने घेतली आहे. काहीही झालं तरी  वाडिया रुग्णालय आम्ही बंद होऊन देणार नाही. आमचे हात जोडलेले आहेत ते असेच जोडलेले राहू द्या असा इशारा देखील शर्मिला ठाकरे यांनी सरकारला दिला होता. 

त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी याप्रश्नी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत वाडिया रुग्णालयाच्या प्रश्नासंबंधी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर वाडिला रुग्णालयासाठी ४६ कोटी रुपयांचं अनुदान देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली. 

हेही वाचा- वाडिया रग्णालयात 'इतक्या' अधिकाऱ्यांची दुहेरी कमाई

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा