Advertisement

वाडिया रग्णालयात 'इतक्या' अधिकाऱ्यांची दुहेरी कमाई


वाडिया रग्णालयात 'इतक्या' अधिकाऱ्यांची दुहेरी कमाई
SHARES

मुंबईतील परळ येथील वाडिया रुग्णालया बंद होण्याच्या मार्गावर आहे. वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून मिळणारे अनुदान थकित असल्याचं कारण देऊन वाडिया रुग्णालय बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या. तसंच, रुग्णांचं अॅडमिशन देखील त्यांनी बंद केलं. तसंच, थकबाकी लवकर मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांनी वाडिया रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. परंतु, अस असतानाच या रुग्णालयातील काही उच्चपदस्थ चक्क महिन्याला दुतर्फा कमाई करत असल्याचे उघड झाले आहे. 

या रुग्णालयांतर्गत असलेल्या बाल रुग्णालय आणि प्रसूती गृह अशा दोन्ही विभागांतून या उच्चपदस्थांना वेतन मिळत असल्याचा आरोप महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केला. सोमवारी त्यांनी हा आरोप केला असून, एवढेच नव्हे तर, या रुग्णालयातून निवृत्त झालेल्या १० कर्मचाऱ्यांनीही दोन्ही विभागांच्या सेवानिवृत्तीचं लाभ मिळवल्याचं काकाणी यांनी म्हटलं आहे.

देशभरात प्रसिद्ध असलेले परळ येथील वाडिया रुग्णालय बंद होणार असल्याच्या वृत्तामुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. लहान मुलांवर योग्य उपचार या रुग्णालयात करण्यात येतात. परंतु, महापालिकेनं अनुदान थकवल्यामुळं हे रुग्णालय सुरू ठेवणं शक्य नसल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे. त्यामुळं महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली.

या संदर्भात महापालिकेच्या गटनेत्यांची सोमवारी महापौर दालनात बैठक पार पडली. या बैठकीनंतर अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन वाडिया रुग्णालयात अनियमितता असल्याचा आरोप केला. वाडिया रुग्णालयाअंतर्गत 'बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय' आणि 'नौरोजी वाडिया प्रसूती गृह' अशी २ रुग्णालये आहेत. एकाच रुग्णालयाचे हे २ विभाग असताना इथं कार्यरत असलेले ६ उच्चपदस्थ अधिकारी दोन्ही विभागांकडून वेतन मिळवत असल्याचं त्यांनी म्हटलं.

महापालिकेच्या ताळेबंदात व रुग्णालयाच्या ताळेबंदात तफावत येऊ लागल्यानं महापालिकेच्या लेखा विभागाचे पथक रुग्णालयात २ महिन्यांपूर्वी पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी आर्थिक अनियमितता असल्याचं आढळून आलं असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला या दोन्ही रुग्णालयांतून प्रत्येकी सुमारे दीड लाख असा तब्बल साडे तीन लाख पगार घेत असल्याचं आढळून आलं आहे. तर रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रेंनी वर्गिस, लेखा परिक्षक दिलीप शाह, विश्वनाथ गायकवाड, वैद्यकीय अधिष्ठाते सुहास पवार, शिष्टाचार अधिकारी निरंजन गायकवाड हे अन्य ५ कर्मचारी देखील दोन्ही रुग्णालयातून मानधन व वेतन घेत असून, ही बाब गंभीर असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर १० कर्मचारी दोन्ही रुग्णालयातून सेवा निवृत्ती वेतन घेत असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

या रुग्णालयाच्या कारभारात अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. राज्य सरकार किंवा पालिकेला न सांगताच या दोन्ही रुग्णालयांतील खाटा वाढविण्यात आल्या. तसंच, कर्मचाऱ्यांचीही वाट्टेल तशी भरती करण्यात आल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे.



हेही वाचा -

तरुणाचे अपहरण करत क्लिन अप मार्शलने उकळले ८ हजार

शिक्षिकेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा