तरुणाचे अपहरण करत क्लिन अप मार्शलने उकळले ८ हजार

कारवाईसाठी पोलिस ठाण्यात नेतं असल्याचे सांगून त्याला कुर्ला येथील निर्जनस्थळी नेहून अक्षरशःडांबून ठेवले.

तरुणाचे अपहरण करत क्लिन अप मार्शलने उकळले ८ हजार
SHARES

बेशिस्त मुंबईकरांना चाप लावण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने क्लिन अप मार्शल नेमले. सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी दिली. मात्र तसे न करता हे मार्शल दादागिरी, धमकी, मांडवली व जोरजबरदस्तीने दंड आकारत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. घाटकोपरने नुकतेच एका मुंबईकराचे अपहरण करत त्याच्याजवळून ८ हजार रुपये उकळले आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घाटकोपर येथून प्रवास करताना तक्रारदार अंतर शर्मा हा लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर रस्त्यात थुंकला. त्यामुळे क्लिन अप मार्शल वाल्यांनी त्याला अडवले. कारवाईसाठी पोलिस ठाण्यात नेतं असल्याचे सांगून त्याला कुर्ला येथील निर्जनस्थळी नेहून अक्षरशःडांबून ठेवले. त्यानंतर शर्मा यांच्याकडून त्यांचे एटीएमकार्ड हिसकावून घेत, बळजबरीने कार्डचा पिननंबर घेऊन त्याच्या खात्यातून तब्बल ८ हजार रुपये काढले. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी ही देण्यात आली.

हेही वाचाः -शिक्षिकेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या

या प्रकरणी अंतर शर्मा यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात घेत, आरोपीं विरोधात अपहरण, जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाअसून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या परिसरातील ही चौथी घटना असून दिवसेंदिवस हे प्रकार वाढत आहेत.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा