शिक्षिकेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या

यास्मिता यांच्या हत्येत किशोरचा हात असल्याचे कळाल्यानंतर पोलिस त्याच्या शोध घेत होते. पोलिस मागावर असल्याचे कळाल्यानंतर किशोरने भांडुपच्या कल्पतरू इमारतीवरून उडी टाकत आत्महत्या केली.

शिक्षिकेची हत्या करून आरोपीने केली आत्महत्या
SHARES

भांडुपमध्ये एका ३७ वर्षिय शिक्षिकेची हत्या करून आरोपीने ही आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.  यास्मिता मिलिंद साळुंखे (३७) असे मृत शिक्षिकेचे नाव असून, मारेकऱ्याचे नाव किशोर सावंत आहे. या प्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भांडुपच्या टँक रोडवरील वक्रतुंड पॅलेस या इमारतीमध्ये यास्मिता साळुंखे पती आणि दोन मुलांसह वास्तव्यास असून त्या मुलुंड येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.तर आरोपी किशोर इस्टेट एजंटचे काम करतो. यास्मिता सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घराबाहेर पडल्या. त्याचवेळी या ठिकाणी दबा धरून बसलेल्या किशोरने त्यांच्या डोक्यावर हातोडीने प्रहार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे यास्मिता जागीच कोसळल्या. हातोडीने त्यांना जबर मारहाण करीत किशोरने पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच भांडुप पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी झालेल्या यास्मिता यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचाः- कांद्यानंतर आता कडधान्य, डाळी महागल्या

यास्मिता यांच्या हत्येत किशोरचा हात असल्याचे कळाल्यानंतर पोलिस त्याच्या शोध घेत होते. पोलिस मागावर असल्याचे कळाल्यानंतर किशोरने भांडुपच्या कल्पतरू इमारतीवरून उडी टाकत आत्महत्या केली. मात्र किशोरने यास्मिता यांची हत्या का केली याचा गुंता पोलिसांना अद्याप सोडवता आला नसून या हत्याकांडामागचे नेमके कारण काय आहे. याचा भांडुप पोलिस शोध घेत आहेत.

संबंधित विषय