Advertisement

कांद्यानंतर आता कडधान्य, डाळी महागल्या

कांद्याच्या भावात घसरण झाली असली तरी, कडधान्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

कांद्यानंतर आता कडधान्य, डाळी महागल्या
SHARES

मागील काही महिने मुंबईसह राज्यभरातील नागरिकांना कांद्यानं प्रचंड रडवलं. अवकाळी पावसामुळं नुकसानं काद्यांच्या पिकांच नुकसानं झालं होतं. परिणामी कांद्याचे दर १५० रुपये झाले. त्यामुळं कांदा खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत होते. परंतु, काहीच दिवांसपूर्वी कांद्याचे दरात मोठी घसरण झाली. त्यामुळं सगळ्यांनाच दिलासा मिळाला. मात्र, आता कांद्याच्या भावात घसरण झाली असली तरी, कडधान्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

अवकाळी पावसामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. दिवाळीनंतर बाजारात नवीन अन्नधान्याची आवक सुरू होते. मात्र, पाऊस असल्यामुळं ही आवक थोड्या उशिरानं ही सुरू झाली. मात्र त्यांच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. अनेक कडधान्य घाऊक बाजारात शंभर रुपये किलोच्या घरात पोहचले आहेत.

किरकोळ बाजारातही कडधान्य १०० ते १२० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. त्यामुळं मागील ८ महिन्यांपासून कांदा, भाजीपाला यांच्या वाढलेल्या दरानम त्रस्त झालेल्यांना आता या कडधान्याच्या वाढत्या दराचा सामना करावा लागणार आहे.

यंदा तूरडाळीचे दर काही प्रमाणात कमी असून, मूग डाळीनं मात्र दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. घाऊक बाजारात तूरडाळ ७० ते ९० रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात ती ८० ते १०० रुपये किलो आहे. तर मूगडाळ मात्र घाऊक बाजारात ८५ ते १०० रुपये किलो झाली आहे आणि किरकोळ बाजारात मूगडाळ ११० ते १२० रुपये किलोच्या घरात पोहचली आहे.

अख्खे मूगही घाऊक बाजारात ८० ते १०० रुपये असून किरकोळ बाजारात ९० ते ११० रुपये किलो झाले आहेत. हिरवा वाटाणा ८० ते ११० रुपये किलो, तर पांढरा वाटाणा ६० ते ७० रुपये किलो घाऊक बाजारात झाला आहे. तसंच, किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा १२० ते १२५ रुपये किलोवर पोहोचला आहे. मटकीचे दरही घाऊक बाजारात ७५ ते ९५ रुपये किलो झाले आहेत. किरकोळमध्ये हे दर ८५ ते १०० रुपये किलो आहेत.



हेही वाचा -

माहूल परिसरातील BPCL कंपनीमध्ये आग

जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बुरशीयुक्त ब्रेड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा